कोकण किनाऱ्यावर कोळथरे(दापोली ) येथे १ एप्रिल पासून ‘कासव जलार्पण ‘सोहळा !
पुणे :
कोकणमधील कोळथरे (तालुका दापोली ) येथील समुद्र किनाऱ्यावरील संरक्षित घरट्यातून कासवाची पिले समुद्रात सुरक्षितपणे सोडण्याचा ‘जलार्पण ‘ सोहळा १ एप्रिल पासून होणार असल्याची माहिती ‘कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ ‘ चे अध्यक्ष दीपक महाजन यांनी पत्रकाद्वारे दिली .
कोळथरे गावात सन २००५ पासून कासव संवर्धन प्रकल्प वन विभाग ,निसर्गप्रेमी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने चालवला जात आहे . त्यास ‘सहयादी निसर्ग ‘ संस्थेचे भाऊ काटदरे,’आगोम ‘चे महाजन , केदार तोडणकर, प्रवीण तोडणकर यांची साथ लाभली आहे.कासवांची सर्वाधिक २३ घरटी या समुद्र किनारी संरक्षित करण्यात आली आहेत .
घरट्यामध्ये कासवाने घातलेली सुमारे ३५५० अंडी ठेवण्यात आली आहे. या घरट्यांमधून लवकरच पिले बाहेर पडून समुद्राकडे धाव घेणार आहेत .
त्यांच्या या नैसर्गिक ओढीचा सोहळा निसर्ग प्रेमींना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाचा वनविभाग, वनक्षेत्रपाल सुरेश वरप , वनरक्षक श्री वडार , सह्याद्री निसर्ग मित्र ‘चे भाऊ काटदरे आणि ‘कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ ‘ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सर्वसाधारणपणे कोळथरे किनाऱ्यावर अंड़ी घातल्यापासून ५२ ते 55 दिवसात पिले बाहेर येतात ,
कोळथरे किनाऱ्यावर वर्षी १ ते 3 एप्रिल , ९ एप्रिल ते १० एप्रिल, २९ एप्रिल ते १ मे या दिवशी कासव पिल्लाचा जलार्पण सोहळा आयोजित केला जातो . पर्यटक हा सोहळा पाहायला येतात . या कालावधी मध्ये सकाळी ६ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता आलेल्या पिलाना त्यांच्या अधिवासात म्हणजेच समुद्रामध्ये सोडण्यात येणार आहे,
ज्यांना हा सोहळा पाहायचा असेल त्यांनी नोंदणी साठी ७७७५८५३४५६, (०२३५८) २८५२२२ /२३
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन , दीपक महाजन यांनी केले आहे.
———————————————————————- (Media Co ordinator : Deepak Bidkar ,Prabodhan Madhyam News Agency ,Pune , 9850583518)–